कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील रणसिंगवाडीचे सुपुत्र अप्पासाहेब घोरपडे यांनी एक वर्षापूर्वी 'हर्ष फाउंडेशन'चे एक छोटेसे रोपटे लावले होते. अल्पावधीतच म्हणजे एका वर्षात या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये नियोजन समितीमार्फत उपलब्ध असलेल्या निधीतून पुढील सहा महिन्यात जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यावर आपला भर राहील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, उदे ग अंबे उदे अशा जयघोषात सातारा जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत शेकडो सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मंडपात दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली.
नामदेव पतसंस्थेचे चेअरमन शिवनाथ मुळे यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते.
फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मिरगाव, ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी, दि. १९ रोजी रात्री साडेनऊ वाजता कन्याशाळेच्या पाठीमागील बाजूस 'तू आपला जा', असे म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुज्जमील शेख, शाहीद बागवान, जहीद बागवान सर्व रा. सोमवार पेठ, सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत चंदनाची लाकडे व एक दुचाकी असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडल्या प्रकरणी चौघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खातवळ, ता. खटाव येथे गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी पाच जणांवर वडुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोटे, ता. कराड येथे पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने आपल्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. पोलिसांनी बाबासो वायदंडे रा. गोटे, ता. कराड याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मारहाण करुन जबरदस्तीने सोन्याची चैन चोरणार्या दोन युवकांना जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून सहा तोळे वजनाची चैन व दोन दुचाकी असा 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.