maharashtra

तांब्याची तार चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


नेले, ता. सातारा गावच्या हद्दीत ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा. : नेले, ता. सातारा गावच्या हद्दीत ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ ते दि. २५ सप्टेंबर दरम्यान नेले गावच्या हद्दीत बिबवीचा माळ शिवारात अज्ञात चोरट्याने ट्रांसफार्मरमधील ऑइल खाली सांडून ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार सचिन सर्जेराव चौरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.