गोडोली, ता. सातारा येथील उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या हॉटेल फर्न जवळून अज्ञात चोरट्याने सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथील उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या हॉटेल फर्न जवळून अज्ञात चोरट्याने सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ते दि.१३ जुलै व दि. २५ सप्टेंबर रोजी गोडोली येथील हॉटेल फर्न जवळ पुणे येथील शिंदे डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचे ४४ हजार २०० रुपये किमतीच्या लोखंडी पाईप, १७ हजार १६० रुपये किमतीचे बेस्ट जॅक, ४८ हजार रुपये किमतीच्या लेसर ड्रेसिंग पाईप, १ हजार २०० रुपये किमतीच्या प्लेटा व अन्य साहित्य असा एकूण सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार गोरक्ष श्रीखंडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


