गोडोली, ता. सातारा येथील उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या हॉटेल फर्न जवळून अज्ञात चोरट्याने सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शांततेचा भंग केल्याप्रकरणी उंब्रज येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा मागे घे नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील, अशी धमकी दिल्याने एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील चार ठिकाणी पोलिसांनी जुगार, दारु अड्डयावर कारवाई केली. १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा शाबित झाल्याने दोन आरोपींना अनुक्रमे तीन महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंड आणि दुसऱ्या आरोपीस तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांनी ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.
ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरून त्या विक्रीसाठी साताऱ्यात आलेल्या दोघांना करंजे नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचे सहा गुन्हे उघडकिस आणण्यात आले असून एक लाख 80 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सेव्हन स्टार इमारतीमधील गाळेधारकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या कारणाचा निषेध केला. पे अँड पार्किंग परिसरात विक्रेत्यांनी बैठक घालून निषेधाच्या घोषणा दिल्या. इमारतीचे विकसक महेंद्र चव्हाण आणि एसटी महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी होत असून त्यामध्ये आर्थिक फटका गाळेधारकांना बसला आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
चक्कर येऊन पडल्याने एकाला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
नेले, ता. सातारा गावच्या हद्दीत ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रदीप धुमाळ यांना अधिसंख्येचे आदेश देण्यासह सेवानिवृत्तांना पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र ने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले.