maharashtra

गेंडामाळ परिसरात घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी


येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२२ रोजी ६.३० ते दि. २३ सप्टेंबर रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास गेंडामाळ येथील पटणी रोडवेज सर्व्हिस गोडाऊनची पाठीमागील खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतमधील लॅपटॉप, डिव्हीआर, वायफाय, राऊटर, दोन एलईडी टीव्ही, दोन मोबाईल, इन्व्हर्टर, कॅमेरा सेटअप व रोख 3 हजार रुपये असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार अरमान फारूक पटणी रा. करंजे पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.