जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 सप्टेंबर रोजी अकरा वाजताच्या दरम्यान आर्चीता सुनील डफळे वय 20, रा. यशवंत कॉलनी, संभाजीनगर, सातारा ही युवती घरामधून कोणासही काहीएक न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सुनील दत्तात्रय डफळे वय 50 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 27 सप्टेंबर रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास संजीवनी सिद्धार्थ वाघमारे ही राहत्या घरातून मावशीकडे जाते असे सांगून कुठेतरी निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद साहिल सिद्धार्थ वाघमारे वय 23 राहणार विद्यानगर कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बुद्ध भाई पवार रा. पिंपळाईदेवी, ता. सुबीर, जि. डांगा, गुजरात हे मासे पकडायला जातो असे सांगून कुठेतरी निघून गेले आहेत. याबाबतची फिर्याद महेश राजेंद्र पाटील वय 26 रा. वारुंजी, ता. कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
चौथ्या घटनेत दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास साक्षी सुधीरकुमार शिगावकर वय 18 ही युवती कॉलेजला जाते असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे याबाबतची फिर्याद सुधीर कुमार सुदाम शेगावकर वैभव रा. पाडेगाव, ता. खंडाळा यांनी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


