maharashtra

काम देतो असे सांगून 321 महिलांची फसवणूक

सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांना गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

321 महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : 321 महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 जानेवारी 2022 ते मार्च 2022 पर्यंत राहुल मोहन रोकडे राहणार जांब, ता. जि. सातारा व विकास नारायण भोगवली, तालुका जावली या दोघांनी 321 महिलांना आठ महिन्यांचे काम देतो, असे सांगून त्यापैकी फक्त एक महिन्याचे काम देऊन प्रशिक्षणासाठी घेतलेले पैसे परत न देता 321 महिलांची सुमारे 3 लाख 85 हजार 200 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.