maharashtra

शिवीगाळ, मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध तक्रार


शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

सातारा : शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ सप्टेंबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पालकर बिल्डिंगशेजारी असणाऱ्या साई इलेक्ट्रिक दुकानासमोर युवराज चंदर दबडे रा. मल्हार पेठ, सातारा यांच्या कार्यालयाच्यावर इलेक्ट्रिक कंपनीचा बोर्ड लावलेला होता. तो काढण्यासाठी परवेज नौशाद, खान अमजद खान यांना सांगितले असता दोघांनी युवराज दबडे यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
परस्परविरोधी तक्रार
दरम्यान परवेज नौशाद खान रा. हिलटॉप कॉलनी, शाहूनगर, सातारा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दि. २७ सप्टेंबर रोजी एक वाजता पालकर बिल्डिंगशेजारी साई इलेक्ट्रिक दुकानासमोरील सामायिक बोळातून मी जात असताना युवराज दबढे यांनी तू या बोळातून जायचे नाही असे म्हणून दमदाटी करून मारहाण केली.