चक्कर येऊन पडल्याने एकाला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : चक्कर येऊन पडल्याने एकाला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनराज लक्ष्मण घोणे वय ४८ रा. सदाशिव पेठ, सातारा यांना अशक्तपणा आल्याने त्यांना सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारसाठी घेऊन गेले असता रुग्णालयाच्या बाहेरच त्यांना चक्कर येऊन ते खाली पडली. तेथून त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर भोसले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.


