मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी जयंत पाटील असे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असा टोला उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
साताऱ्यातील राजवाडा परिसरात पथारी मांडण्यावरून भाजी विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भांडण अगदी रस्त्यावर आल्याने ऐन वर्दळीच्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनःस्ताप सोसावा लागला.
राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज, बुधवारी शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी सातारा येथे दुचाकी रॅली काढली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षक, शासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.
सज्जनगड, ता. सातारापासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या परिसरात दीड महिने वयाचा नरजातीचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता. सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण आणि सह्याद्री प्रोटेक्शन ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने या बिबट्याला त्याच्या आईचा सहवास मिळाला. मादी बिबट्या त्याच्या पिल्लाला घेऊन डोंगरालगतच्या घनदाट जंगलात निघून गेली.
येथील निरीक्षण गृहातून १६ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले असून, ही घटना दि. १९ सकाळच्या सुमारास समोर आली. याबाबत निरीक्षण गृहातील कर्मचारी प्रवीण संभाजी साबळे वय ५४, रा. शिवथर, ता, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लिंबखिंड, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
आरळे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने २ लाख ५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वर्ये, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंदोली, ता. कराड येथील ग्राम विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करून 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांचा अपहार करणाऱ्या पतसंस्थेचा व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे, रा. इंदोली, ता. कराड याला उंब्रज येथे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
डिजिटल युगात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून त्यांचे ज्ञान असणारे सक्षम नेतृत्व करु शकतील असेच सरपंच, सदस्य असले पाहिजेत. गावच्या विकासासाठी लोकसहभाग श्रमदानाची स्वयंस्फूर्तीने साथ मिळत गेल्यास ग्रामपंचायतीच्या कामाचा लौकिक सर्वदूर पोहचेल, असा विश्वास पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी व्यक्त केला.