maharashtra

दहिवडी येथे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडल्या प्रकरणी चौघांवर गुन्हे


दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत चंदनाची लाकडे व एक दुचाकी असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडल्या प्रकरणी चौघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत चंदनाची लाकडे व एक दुचाकी असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडल्या प्रकरणी चौघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० सप्टेंबर रोजी १२.४० वाजण्याच्या सुमारास दहिवडी गावच्या हद्दीत पोलीस नाईक नीलम संतोष रासकर यांनी श्रीकांत सयाजी चव्हाण, दिनकर रामभाऊ चव्हाण दोघेही रा. चव्हाण वस्ती, दहिवडी, तानाजी पतंग चव्हाण, समीर बाळू हवालदार दोघेही रा. गांधीनगर, दहिवडी यांचा पाठलाग केला. त्यांना अडवल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये ओलसर चंदनाच्या लाकडाबाबत विचारपूस केली असता त्यांनी ती चंदनाची लाकडे तोंडले, ता. माण गावच्या हद्दीतून चोरी करून आणली असल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यातून चंदनाची लाकडे व एक दुचाकी असा एकूण ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.