maharashtra

फलटण तालुक्यातील महिलेवर अत्याचार

मिरगाव येथील एकावर गुन्हा

फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मिरगाव, ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मिरगाव, ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ सप्टेंबर रोजी २ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव करीत असणाऱी महिला घरी एकटी असताना अरविंद नानासो सरक, रा. मिरगाव, ता. फलटण यांनी पाठीमागून घरातून येऊन घराची कडी आतुन लावली. त्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत तू तुझ्या घरातील कोणालाही माझ्याबद्दल काही सांगू नकोस जर सांगितलेस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.