maharashtra

खातवळ येथे मारामारी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा


खातवळ, ता. खटाव येथे गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी पाच जणांवर वडुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : खातवळ, ता. खटाव येथे गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी पाच जणांवर वडुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० सप्टेंबर रोजी खातवळ येथे तेथीलच अंकिता आनंदराव वाघमारे वय २२ या महिलेच्या नवीन घराच्या विटा पाडल्याच्या कारणावरून मामी सुमन गौतम शिंदे व मंदाकिनी ज्ञानदेव शिंदे आणि रितेश भीमराव शिंदे, महेंद्र लालासो शिंदे, अण्णा तायप्पा शिंदे, प्रथमेश आनंदा शिंदे, आणि निरंजन मुकीद शिंदे यांच्यात वाद सुरू होते. ते ऐकून अंकिता वाघमारे ही महिला त्या ठिकाणी जाऊन वाद सोडू लागली. त्यावेळी तिला रितेश भीमराव शिंदे हा तिच्या मामीला मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले. तिने त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने अंकिता वाघमारे हिला ढकलून देऊन तिच्या पायाच्या पोटरीवर मारून तिला जखमी केल्याची तक्रार वडुज पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर वरील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.