गुन्हा मागे घे नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील, अशी धमकी दिल्याने एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : गुन्हा मागे घे नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील, अशी धमकी दिल्याने एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ ऑगस्ट रोजी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा येथील महिंद्रा हॉटेलच्या शेजारी ग्लोबल वर्कशॉप जवळ आकाश उर्फ बाळा खुडे रा. करंजे पेठ, सातारा याने अमीर हुसेन शेख रा. विसावा कॅम्प, सातारा यांना सनी आवळे याच्यावर असलेला मोक्याचा गुन्हा मागे घे, नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


