ट्रान्सफॉर्मर मधील तारांची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
एक लाख 80 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेचे यश
ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरून त्या विक्रीसाठी साताऱ्यात आलेल्या दोघांना करंजे नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचे सहा गुन्हे उघडकिस आणण्यात आले असून एक लाख 80 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरून त्या विक्रीसाठी साताऱ्यात आलेल्या दोघांना करंजे नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचे सहा गुन्हे उघडकिस आणण्यात आले असून एक लाख 80 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अतिक्रमण विजय काळे राहणार रेवडी, तालुका कोरेगाव व आकाश प्रकाश भोसले वय 32 राहणार मर्ढे, जिल्हा सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे आरोपी करंजे नाका परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना कळाली होती. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मधुकर गुरव, मदन फाळके यांच्या एका विशेष पथकाने करंजे नाका परिसरात सापळा रचला आणि आरोपी विजय काळे आणि त्याचा साथीदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कब्जामध्ये 226 किलो वजनाच्या ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा आढळून आल्या. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मागील चार वर्षाच्या कालावधीत सातारा व वाई तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारांची सहावेळा चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
या गुन्ह्याच्या तपासात सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, उत्तम दबडे, तानाजी माने, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अजित करणे, गणेश कापरे, प्रवीण कांबळे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.


