शिक्षण विभागातर्फे शाळेच्या करण्यात आलेल्या वार्षीक तपासणीसाठीच्या खर्चापोटी 1875 रुपये मागून त्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी उंब्रज येथील दोन्ही शिक्षकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन झाला असून दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले आहे.
संशयिताचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने अटकेत असलेले पोलीस अधिकारी हणमंत काकंडकी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आमदार जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात गोरे यांना जामीन मंजूर झाला आहे.
आमदार जयकुमार गोरे शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने तुर्तास त्यांची अटक टळली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.
पडळ, ता. खटाव येथील साखर कारखान्यावर ११ मार्च २०२१ रोजी झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढून ती जिंकली होती.
वारूंजी, ता. येथे खासगी व्यवहारातून आर्किटेक्टला मारहाण झाल्याप्रकरणी शनिवारी 20 रोजी सात जणांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला. याप्रकरणात नितीन छाजेड यांना कोणतीही मारहाण झालेली नाही.
मोक्कातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणे ही अत्यंत धोकादायक बाब असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.