शिक्षण विभागातर्फे शाळेच्या करण्यात आलेल्या वार्षीक तपासणीसाठीच्या खर्चापोटी 1875 रुपये मागून त्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी उंब्रज येथील दोन्ही शिक्षकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन झाला असून दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले आहे.
सातारा : शिक्षण विभागातर्फे शाळेच्या करण्यात आलेल्या वार्षीक तपासणीसाठीच्या खर्चापोटी 1875 रुपये मागून त्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी उंब्रज येथील दोन्ही शिक्षकांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन झाला असून दर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) हजेरी लावण्याचे आदेश करण्यात आले आहे.
सौ.उज्वला रघुनाथ पोळ (वय 56, रा. शहापूर ता.कराड) व बापू सर्जेराव सुर्यवंशी (रा.भोयचीवाडी पो.पेरले ता.कराड) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, उंब्रज ता. कराड येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदीर शाळेची शिक्षण विभागाकडून वार्षीक तपासणी करण्यात आली होती. शाळा तपासणीसाठी आलेल्या पथकाची शाळेकडून खातरजमा करण्यात आली होती. जेवणासह इतर खर्च झाल्याने तो वसूल करण्यासाठी संशयित दोघांनी इतर शिक्षकांकडून वसूली करण्यास सुरुवात केली. यावरुन एसीबीत तक्रार झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या माार्गदर्शनाखाली बुधवारी ट्रॅप करुन दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी 30 हजार रुपयांवर जामीन करण्यात आला. तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत हजेरी ठेवण्यात आली.


