‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले.
‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले.
‘सद्य:स्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती उपयुक्त असून, आपल्या देशाच्या संरक्षण विभागाने शिवयुद्धनीतीतून धडे घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इतिहास अभ्यासक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी दिली.
‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.