मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी दिली.
सातारा : मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे असतील तर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता घार्गे व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव संपन्न इतिहास, वर्तमान काळातील भाषेचे स्वरूप व भाषा संवर्धन आदी विषयांवर ऊहापोह होणार आहे. तरी सातारा परिसरातील विद्यार्थी व भाषाप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. घनश्याम गिरी व प्रा. निरंजन फरांदे यांनी केले आहे.