विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा
डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचे आवाहन : सावित्रीबाई फुले महिला कॉलेजमध्ये ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
सातारा : ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती विभाग, विशेष स्थायी समिती, बीसी सेल व शिष्यवृत्ती कार्यालयीन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज मार्गदर्शन कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सातारा समाजकल्याण विभागातील गणेश अतकरे व महाविद्यालयीन शिष्यवृत्ती विभागाचे नोडल ऑफिसर प्रा. डॉ. गजानन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेस समाज कल्याण विभाग, सातारा यांच्या वतीने गणेश अतकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील विविध घटकांच्यासाठी तसेच महिला वर्गासाठी असलेल्या अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती अतकरे यांनी दिली. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे आदी गोष्टी अतकरे यांनी समजावून सांगितल्या.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनीही जागरूक असणे गरजेचे आहे, असे मत यावेळी अतकरे यांनी व्यक्त केले.
नॅक समन्वयक डॉ. जयश्री आफळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रा. डॉ. गजानन भोसले यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. मराठी विभाग प्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. अभिजित फटे यांनी तंत्रसहाय्य केले. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप पवार यांनी आभार मानले.