भोसलेवाडी, तालुका कराड येथील वीट व्यवसायिकांकडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी सैन्य दलात कार्यरत असणारे जवान परशुराम राठोड यांच्या राहत्या घरापासून अवघ्या पाच फूट अंतरावर वीट भाजण्यासाठी भट्टी रचनेचे काम सुरू आहे. तरीही महसूल विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे.
वडिलांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करणाऱ्या निसराळे सेवा सोसायटीच्या विरोधात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. या अन्यायाच्या विरोधात येथील निवृत्त जवान बाळकृष्ण लक्ष्मण घोरपडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे.
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे. लष्कराचं ऑपरेशन रक्षक सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले आहेत. सुरज शेळके हे साताऱ्यातील खटाव गावचे सुपूत्र आहेत. जवान सुरज शेळके यांच्या जाण्यानं खटावमध्ये शोककळा पसरली आहे.
शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ओझर्डे (ता. वाई) येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय 38) यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. तांगडे यांच्या जाण्याने ओझर्डेसह वाई तालुक्यात शोककळा पसरली आहे.