कराडला अमर जवान स्मृती स्तंभास मान्यवरांकडून अभिवादन
25 वा विजय दिवस समारोह : रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कराड : येथील विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमर जवान स्मृती स्तंभास नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, लेफ्टनंट बी. जी. जाधव, आॅनररी कॅप्टन जगन्नाथ पाटील, आॅनररी कॅप्टन बाबूराव कराळे, सुभेदार मोरे, विजय दिवस समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सहसचीव विलासराव जाधव, नगरसेवक आप्पा माने, प्रा. बी. एस. खोत, महालिंग मुंढेकर, चंद्रकांत जाधव, पौर्णिमा जाधव, श्रीमती अरुणा जाधव, दिलीप पाटील, उद्योजक दीपक अरबुणे, सलीम मुजावर, गणपतराव कणसे, जयवंतराव मोहिते, रत्नाकर शानभाग, रमेश पवार, सतीश बेडके यांनी अभिवादन केले.
1971 च्या युद्धात बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताने मोठा विजय मिळवून दिला होता. या विजयास यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शुक्रवारी १७ रोजी देशभर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. करण्यात आला. कराडातही बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ्य गेली 24 वर्षे 16 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर विजय दिवस साजरा केला जातो. यंदाचे हे 25 वे वर्ष आहे.
दोन वर्षापासुन कोरोनामुळे विजय दिवस समारोह स्थगीत करण्यात आला आहे. या वर्षीही हा समारोह साजरा करण्यात आला नाही. परंतु, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह निमित्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विजय दिवस समारोह समिती, कराड व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवक, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


