maharashtra

शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात खटाव येथे अंत्यसंस्काऱ


Funeral of Martyr Jawan Suraj Shelke at Khatav
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातारा : शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील व विविध विभागाचे अधिकारी यांनी शहीद जवान सुरज शेळके यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
शहीद सुरज शेळके यांचे वडील प्रताप व बंधू गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद जवान सुरज प्रताप शेळके हे तीनच वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षक दरम्यान वयाच्या 23व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.