सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
‘पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून, ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज केले.
‘एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरू असतानाच दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचा परिसर असलेल्या वरकुटे-मलवडीच्या विकासाला नवी दिशा देणार आहे,’ असे प्रतिपादन कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुवर्णाताई देसाई यांनी केले.