maharashtra

गजानन हाऊसिंग सोसायटीत विविध विकासकामांचे भूमिपूजन

विकासकामांची गंगा चालूच राहील : पावसकर

Bhumipujan of various development works in Gajanan Housing Society
गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन  मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

कराड : गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन  मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, विरावडेचे उपसरपंच सागर हाके, अमोल देशमुख, राजू रामुगडे, बापू गांधले, बापू लांडगे, अमर जाधव, रवी डोंबे, दिलीप शिंदे, मनोज वीर, अविनाश मंडकई, तेजस वझे, संदीप गुज्जट्टी, महिला भाजपाच्या शहराध्यक्षा मंजरी कुलकर्णी, महिला मोर्चा कराड उत्तरच्या अध्यक्षा शितल कुलकर्णी, कराड तालुका  महिला ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष धनश्री रोकडे व नागरिक उपस्थित होते.
सदर विकासकामांमध्ये जिल्हा नियोजन समितीमधून 3054 या योजनेअंतर्गत गणपती मंदिर ते एमएसीबीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मौजे गोवारे ता. कराड येथे गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये मिलिंद किर्लोस्कर यांच्या घरापासून सुभाष शिवडेकर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण 5 लाख, संदीप गुजट्टी यांच्या घरापासून जगदीश घोरपडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटारसाठी 4 लाख असे एकून २४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी, जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध विकासकामांची गंगा अशीच चालू राहील, असे आश्वस्त केले. दरम्यान, रामकृष्ण वेताळ यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मदत करून अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त केले.