कास परिसरातील बांधकाम नियमितीचा आदेश म्हणजे बलात्कार करणार्याला नवरा मानून घेयला लावणं ?
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा विरोध, मुख्यमंत्री भूमिका बदलणार का ? पर्यावरण प्रेमी आंदोलनाच्या तयारीत .
सातारा जिल्ह्यातील कास पठार आणि परिसर हा वर्ल्ड हेरिटेज इको सेन्सिटिव्ह झोन असून याठिकाणी परवानगी शिवाय काही करता येत नाही याठिकाणी बांधकाम करण्यास बंदी असताना देखील , स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून इथल्या जमिदाराला रखवालदार करुन , या ठिकाणी अनेक धनदांडग्यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली , ही बांधकामे करताना धनदांडग्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून आर्थिक देवाण-घेवाण करुन ही बेकायदेशीर बांधकामे उभी केली, हे सगळं करण्यासाठी मदत करणार्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणं गरजेचं असताना, याठिकाणी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून , मुख्यमंत्र्यांचा कास ची बांधकाम नियमित करण्याचा आदेश म्हणजे बलात्कार करणार्याला नवरा मानून घेयला लावण? अशी चर्चा सध्या सातार्यात असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा विरोध असून, मुख्यमंत्र्यांनी कास परीसरातील जैवविविधतेचा विचार करून याठिकाणची जैवविवि धोक्यात येत असल्याने आपली भूमिका बदलावी? अशी मागणी पर्यावरण प्रेमी तसेच सातारकरांकडून होत आहे.