सातारा जिल्ह्यातील कास पठार आणि परिसर हा वर्ल्ड हेरिटेज इको सेन्सिटिव्ह झोन असून याठिकाणी परवानगी शिवाय काही करता येत नाही याठिकाणी बांधकाम करण्यास बंदी असताना देखील , स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून इथल्या जमिदाराला रखवालदार करुन , या ठिकाणी अनेक धनदांडग्यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली , ही बांधकामे करताना धनदांडग्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताश�...
यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला याबरोबर बामणोली परिसराकडे जाण्यासाठी घाटाई मार्ग रस्ता खुला करण्याची माहिती दिली. यावेळी कास पठारावर कामी होणारे फुलांचे प्रमाण याबाबतची जिल्हाधिकार्यांनी गांर्भियाने दखल घेवून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिला. लवकरच इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ‘साहस वार्ता’ शी बोलतांना सांगितले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!