sports

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’चे एक दिवसीय धरणे आंदोलन


केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले. 

वडूज : केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीन कायदे हे शेतकर्‍यांच्या विरोधात आहेत. सदर कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीकरिता दिल्ली येथे दीर्घकाळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने खटाव तहसीलदार कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून याबाबत निवेदन देण्यात आले. 

यावेळी जिल्हा सचिव सुनील कदम, खटाव तालुकाध्यक्ष कृनाल रायबोळे, अशोक बैले, सुधाकर कंठ, अजय मदने, आदिक कांबळे, राहुल जाधव, कृष्णात केंजळे, लालाजी केंजळे, जीवन तडाखे, विश्‍वास जगताप, दयानंद शिंदे, अजय कंठ, गिरीधर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.  

निवदेनातील अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी वर्गाला उद्ध्वस्त करणारे असून, हे तीन कायदे रद्द करावेत, अशी मागणी होत आहे. ही मागणी शेतकर्‍यांच्या हिताची असून वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसर्‍या टप्प्यात राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत. 

तरी या शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दिल्ली येथे दीर्घकाळ चाललेले शेतकर्‍यांचे आंदोलन थांबवावे. तसेच या प्रश्‍नावर शासनाने तोडगा न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही निवेदनात दिला आहे.