sports

सातारा जिल्हा हादरला, 828 बाधित

13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. बाधितांनी 15 हजारांचा टप्पा ओलांडल्यापासून 600 ते 700 रुग्णांची भर दररोज पडू लागली आहे. गुरुवारीदेखील तब्बल 828 बाधित आढळून आले.

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. बाधितांनी 15 हजारांचा टप्पा ओलांडल्यापासून 600 ते 700 रुग्णांची भर दररोज पडू लागली आहे. गुरुवारीदेखील तब्बल 828 बाधित आढळून आले. तसेच 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 443 जणांचा बळी गेला आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक 870 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी व सीसीसी येथे उपचार घेत असलेले 870  जण कोरोनामक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्तांची संख्या वाढणेही गरजेचे आहे. त्यादृष्टीने  प्रशासन कसोशीने प्रयत्न आहे.

682 जणांचे स्त्राव तपासणीला 
682 जणांचे स्त्राव तपासणीला स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 11, उपजिल्हा रुग्णालय, कराड 13, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगाव 76, पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्‍वर 50, दहिवडी 49, खावली 41 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 166 अशा एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.