येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए.च्या द्वितीय वर्षात शिकणारी व माण तालुक्यातील जाशी गावची ऋतुजा शांतीलाल पाटील हिची अवघ्या 19व्या वयात ‘झुळूक’ नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिने साहित्य क्षेत्रात ‘युवा लेखिका’ म्हणून पदार्पण केल्याबद्दल तिचा दै.‘मुक्तागिरी’ व ‘मुक्तांगण’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
सातारा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बी. ए.च्या द्वितीय वर्षात शिकणारी व माण तालुक्यातील जाशी गावची ऋतुजा शांतीलाल पाटील हिची अवघ्या 19व्या वयात ‘झुळूक’ नावाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तिने साहित्य क्षेत्रात ‘युवा लेखिका’ म्हणून पदार्पण केल्याबद्दल तिचा दै.‘मुक्तागिरी’ व ‘मुक्तांगण’ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी दै.‘मुक्तागिरी’चे संपादक व जिल्हा बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई, ‘मुक्तांगण’च्या संचालिका सौ. अर्पणा देसाई, वृत्तसंपादक दीपक देशमुख, उपसंपादक/मुद्रितशोधक विकी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
ऋतुजा आपल्या मनोगतात सांगते की, माझे वडील देवाघरी गेल्याचे दुःख मला खूप झाले. त्यातून मी वडिलांच्यावर एक कविता सकाळ दैनिकात लिहिली. या कवितेला खूप प्रतिसाद मिळाला. दहावीच्या उन्हाळा सुट्टीत मी दहा कादंबर्या वाचल्या. मी अकरावी व बारावी सायन्सला होते. 11 वीमध्ये मी पहिल्या सत्रात 58 पाने कादंबरी लिहिली होती. छ. शिवाजी कॉलेजला आल्यावर वाचन वाढवले आणि कादंबरी पूर्ण केली. मला या काळात गौरव खतकलले, गुरू पाटील, वसतिगृहातील मैत्रिणी सलोनी मुजावर व प्रियांका लोखंडे यांनी केलेली मदत व सहकार्य याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुखपृष्ठ काढणारे चेतनकुमार चौगुले, प्रस्तावना लिहिणारे कमलेश गोसावी यांचे यांचे सहकार्य तिला झाले.


