sports

जिल्ह्यात दिवसभरात 485 कोरोनाबाधित

उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी 485 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी 485 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात 324 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर आतापर्यंत 11,138 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

आणखी 218 जण कोरोनामुक्त 
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 218 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये कराड तालुक्यातील 47, खंडाळा 19, खटाव 13, कोरेगाव 8, माण 9, पाटण 24, फलटण 1, सातारा 55, वाई 42 अशा एकूण 218 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.

864 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 15, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 88, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 142, कोरेगाव 23, वाई 76, खंडाळा 84, रायगाव 33, पानमळेवाडी 159, मायणी 54, महाबळेश्‍वर 25, दहिवडी 33 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 132 अशा एकूण 864 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.