फलटण प्रतिनिधी - येथील नगर पालिकेने उभारलेल्या राजधानी टॉवर्स मधील गाळ्यामध्ये एका व्यवसायिकाने खिडकीच्या जागी शटर बसवून बदल करीत दुकानाचा पायऱ्या काढीत अतिक्रमण केल्याची तक्रार पालिकेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केली असुन या बाबतीत माहिती घेऊन पुढील कारवाईचे आश्वासन नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहे
दरम्यान नूतन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आज फलटण पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा आजच पदभार स्वीकारताच त्यांच्या पुढे पालिकेतील गटनेते अशोकराव जाधव व नगरसेवक सचिन अहिवळे यांनी पालिकेत बांधकाम विभागात लेखी तक्रार केली आहे.यावेळी जागेची पाहणी करीत अशोकराव जाधव व सचिन अहिवळे यांनी निदर्शनास आणून देत पालिकेला लागून असलेल्या या राजधानी टॉवर्स मध्ये गाळा 1 व 2 मध्ये प्लॅन(आराखडा)या मध्ये स्थायी समितीच्या ठरवातून या दोन्ही गाळ्यात बदल करण्याची परवानगी दिली असून ती बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून देत.
हे लोक पालिकेच्या जागेतील/मालकीतील गाळ्यात बेकायदेशीर बदल केला असून या कामाची तक्रार जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे करणार असून हे बांधकाम पूर्वी असलेल्या प्रमाणे करावे अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान यावेळी बोलताना अशोकराव जाधव यांनी सांगितले की, राजधानी टॉवर्स मधील गाळ्यात केलेल्या बेकायदेशीर बदलामुळे स्थायी समिती मध्ये केलेला ठराव रद्द करून ज्यांनी या ठरावाला सूचक व अनुमोदक आहेत त्यांचे पद रद्द करण्याची मागणी यावेळी अशोकराव जाधव यांनी केली आहे


