फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
फलटण प्रतिनिधी:- शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक वाद्यात आणि भव्यदिव्य देखाव्यासहित मिरवणुका काढून साजरी करण्यात आली.
अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला.
खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
फलटण शहरातील एका हॉस्पिटलमधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी सहाजणांना पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
शेतकऱ्यांचा जळलेला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी वेळ लागत होता. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. त्यामुळे लगेचच ऊर्जा विभागाकडून एकाच दिवसात 58 ट्रान्सफॉर्मर फलटण मध्ये दाखल झाले असून अधिकारी व शेतकऱ्यांनी खासदार रंजितसिंहाच्या कामाचे कौतुक केले.
एकंदरीतच मिस्टर रामराजेंसारखा गद्दार आणि लाचार पंटर फलटण तालुक्याला मिळाला होता, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर नाव न घेता केली आहे.
रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
बारामती व फलटण तालुक्याला एकत्रित जोडणारा नीरा नदीवरील पूल सोमेश्वर मंदिरानजिक होणार असल्याने त्याची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली व या पुलाला निधी देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
माढा मतदारसंघात ज्यांच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे थोड्या अवधीतच पूर्णत्वास गेल्याने मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते काहीही वक्तव्ये करीत असल्याचे सांगत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली.
टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वे कामासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.
मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणला पण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे. हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला, असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरीत्या राष्टवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना जबाबदार धरले आहे.
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथील मांगोबा माळ येथे गेल्या १० महिन्यांपासून केंद्रीय जल जीवन मिशन या योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांची वीज चोरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासोबतच फलटण शहरामधून जो पालखी मार्ग मार्गस्थ होत आहे, तो मार्ग सुद्धा व्यवस्थित करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.
फलटण, ता. फलटण येथील मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
फलटण शहरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
फलटण, ता. फलटण येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवल्याने विक्रेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपालिका व अतिक्रमण हटाव विभागाच्या विरोधात आंदोलन केली. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण, असा खडा सवाल त्यांनी केला.
पिंपरद, ता. फलटण येथे तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन एकास सहाजणांनी मारहाण केल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गेल्या सुमारे १० वर्षांपासून देशातील ११ राज्यात आणि ८ महिन्यांपासून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत कंपनीने आपले कार्य सुरु केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन देहात पशू खाद्य विभाग व्यवस्थापक संदीप शेळके यांनी केले.
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने कुर्हाड, काठी, दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पठाणवस्ती, खामगाव, ता. फलटण येथील पाचजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अज्ञात चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत रामचंद्र तुकाराम जगदाळे (वय 35, रा. पाचवड, ता. माण) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ओह.
स्वराज इंडिया ऍग्रो ची 4 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण बसस्थानकात अज्ञात चोरट्याने एका महिलेचे एक लाख 68 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
फलटण शहरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फलटण शहर परिसरातून सुमारे बारा लाखांची तांब्याची तार चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
फलटण लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावर लहान पुल व पोहोच रस्ता बांधकाम करण्यात येणार असल्याने, दि. 24 डिसेंबर 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत चार महिने या रस्त्यावरील पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येणार आहे.
कोळकी, ता. फलटण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिगंबर आगवणे च्या अडचणीत आणखी भर पडले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात आगवणेवर 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जबरी चोरीचा बनाव करुन नोकरानेच सुमारे 11 लाखांची रक्कम लांबविल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संशयितास अटक करीत त्याने लंपास केलेली रक्कम हस्तगत करण्यात फलटण पोलिसांना यश आले आहे. जबरी चोरीचा हा बनाव संशयिताने त्याच्या मुलीच्या उपचारासाठी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पंढरपूर महामार्गावरील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे डांबरी रस्ता सोडून सुमारे चाळीस फूट आतमध्ये असलेल्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सासकल, ता. फलटण येथील रामोशी समाजाच्या समाज बांधवांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यापूर्वी आपले योग्य जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्याकडे केली आहे.
फलटणमध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून हे अर्भक बाल शिशुगृहात पुढील संगोपनासाठी दाखल केले आहे.
पोलिसांचा तडाखा खाल्यानंतर खरं तर मोक्का लावण्याची गरज असताना देखील पोलिसांच्या मेहरबानीने मोकाट फिरून आणखी कांड करत असलेल्या आकाश डांगे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत आहेत.
शिंदेनगर, ता. फलटण गावच्या हद्दीत विहिरीच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
गॅस एजन्सीच्या आमिषाने फलटणमधील डॉक्टरची सुमारे अकरा लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.
निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत एका दाम्पत्याच्या जवळ असलेली पर्स व त्यातील सुमारे ७४५०० रुपयांचा मुद्देमाल तीन अनोळखी व्यक्तींनी जबरी चोरी करून लुटून नेला आहे.
हिंगणगाव-कापशी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीने मुलाला धडक दिल्याने तो पाठीमागील चाकाखाली आला. त्यात गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस महेंद्र खताळ (वय १२, रा. कापशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध विकास खताळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणमधील सोमंथळी येथे मोठी घटना घडली आहे. या घटनेत सोमंथळी पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला आणि या पुरात कार बुडाली. ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. मात्र या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.
आर्मीमध्ये नोकरीला लावतो म्हणून कोरेगाव तालुक्यातील एकाला फलटण तालुक्यामधील एकाने व माण तालुक्यातील एकाने फसवले असल्याबाबत तक्रार दाखल झाल्यावर दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र नामदेव कोडवलकर व अवचित दादासो ताटे अशी फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत.
विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने चारचाकी कारची पाठीमागील काच तोडून १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्टच असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मिरगाव, ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
संवाद यात्रेच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या, अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दौऱ्याच्या निमित्ताने राजुरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
बनावट प्लायवूड विक्री केल्याप्रकरणी चौधरवाडी, ता. फलटण येथील अमोल विलास चौधरी (वय 34) या व्यापार्याविरोधात कॉपीराईट अधिनियमानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
गोविंद मिल्क डेअरी मधील मिल्क पावडर चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना फलटण, ता. फलटण येथे घडली आहे.
फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात तीनजण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कौटुंबिक वादातून नातवाने वयस्कर आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे यांना अटक करुन त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना फलटण पोलिसांनी अटक केली
सालपे, तालुका फलटण येथे एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा लाखाची घरफोडी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालकांवर बेछूट आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या दिगंबर आगवणे यास स्वराज नागरी पतसंस्थेकडून दाखल असलेल्या फसवणुकीच्या तक्रारप्रकरणी अटक केली आहे.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटणमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे 49 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
फरांदवाडी, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अलगुडेवाडी, तालुका फलटण येथे जमीनीच्या कारणावरून एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी चौघा जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.
भारतीय दलीत पँथरपासून कार्यरत असलेले फलटण येथील लढाऊ पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात दुःख व्यक्त केले जात आहे.
नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले.
जरा आजूबाजूच्या फलटण, दौंड, इंदापूर तालुक्यात जाऊन बघा, तिथल्या आणि इथल्या परिस्थितीत किती फरक आहे? गेली दोन दशके फलटणची जनता राष्ट्रवादीला कौल देत आहे, पण चार वेळा सत्तेत असून ही राष्ट्रवादीला फलटण तालुक्याचा विकास करता आला नाही, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
स्वराज पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि. कंपनीत पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवत विडणी, ता. सातारा येथील मोहन लक्ष्मण खरात वय 40 यांची सुमारे 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे, त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे यांच्यासह संतोष तुकाराम आगवणे सर्व रा. गिरवी, ता. फलटण या तिघांवर फलटण शहर पोलीस गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत आगामी काळामध्ये फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली.
फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावात फलटण-दहिवडी रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका 26 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धीरज गुंजवटे असे मृत युवकाचे नाव असून त्याच्या डोक्याला, नाकाला मार लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मात्र, घटनास्थळापासून अर्धा कि. मी. अंतरावर त्याचा मोबार्इल आढळला असल्याने हा प्रकार खून की अपघात, अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
सातारा येथील युवतीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील युनूस बालेखान पठाण आणि त्याचा सहकारी नौशाद पठाण यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
बीबी, ता. फलटण येथे दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका संशयिताला लोणंद वडगाव पोलिसांनी जेरबंद केले.
लटणमधील उद्योजक दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करीत त्यांच्यासह कारखाना व पतसंस्था संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेत आगवणेंच्या आरोपांचे खंडण करीत आगवणे हेच मिस्टर नटवरलाल असून आगवणेंना जे मदत करीत असतील, त्यांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही खा. नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शेवटचा भारतीय सुरक्षित मायदेशी परतेपर्यंत देशाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी देश प्रथम आहे, तरी भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवल्या जाणार्या शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे.
बंधन बँक लि. शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेल्या समाधान भिमराव वजाळे (वय २३, सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण) याने आपणास 4 जणांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटल्याची तक्रार मंगळवार दि.22 फेब्रुवारी ला दिली होती. मात्र तपासात तक्रारदारानेच बँकेच्या पैशावर डल्ला मारण्याची शक्कल पुढे आल्याने अखेर त्याला अटक करण्यात आली.
फलटण येथून दोन पिस्तुल व एका काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ३ पिस्तूल, १ जिवंत काडतुस, ७ मोबाइल, ११ बॅटऱ्या, एक स्विफ्ट कार, शस्त्र व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. किरण बबन साळुंखे, वय ३८, सध्या रा. लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा आणि तरबेज मेहबूब सुतार, वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, वरखडे नगर, कात्रज, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फलटण तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ४२० रुपये किमतीच्या हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
फलटण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धन्यकुमार गोडसे, चार पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गौरविले आहे.
माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी ६९७ कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
फलटण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई करत सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून १० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी प्रशांत सतीश भिसे वय १९, महेश उर्फ अक्षय विकास गायकवाड वय २६, आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या सुरवडी ता.फलटण येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बरड, ता. फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद, केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण १५ जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण राजवाडा शाखेसमोर एक अज्ञात व्यक्तीने पाठीमागे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून दिशाभूल करून पडलेले पैसे उचलत असताना मोटार सायकल हँण्डलला अडकविलेली 50 हजार रुपये रक्कम असलेली पैशांची पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.