केस पांढरे होणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत, पन्नास टक्के लोकांचे कमीतकमी पन्नास टक्के केस पांढरे होण्याची शक्यता असते. कॉकेशियन्समध्ये वयाच्या विसाव्या वर्षांआधी, एशियन्समध्ये वयाच्या पंचविशीपूर्वी आणि आफ्रिकन लोकांमधे वयाच्या तिशीपूर्वी केस पांढरे होण्यास सुरुवात झाली, तर ते ‘अकाली (प्रिमॅच्युअर) ग्रेयिंग’ म्हणून ओळखले जाते. वैद्यकीयदृष्टया याला ‘अकाली कॅनिटीज’ही म्हणतात आणि बर्याचदा तरुणांमधील न्यूनगंडाचे हे एक प्रमुख कारण ठरते.
केस पांढरे होणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे आणि वयाच्या पन्नाशीपर्यंत, पन्नास टक्के लोकांचे कमीतकमी पन्नास टक्के केस पांढरे होण्याची शक्यता असते. कॉकेशियन्समध्ये वयाच्या विसाव्या वर्षांआधी, एशियन्समध्ये वयाच्या पंचविशीपूर्वी आणि आफ्रिकन लोकांमधे वयाच्या तिशीपूर्वी केस पांढरे होण्यास सुरुवात झाaaली, तर ते ‘अकाली (प्रिमॅच्युअर) ग्रेयिंग’ म्हणून ओळखले जाते. वैद्यकीयदृष्टया याला ‘अकाली कॅनिटीज’ही म्हणतात आणि बर्याचदा तरुणांमधील न्यूनगंडाचे हे एक प्रमुख कारण ठरते.
केसांना रंग कसा मिळतो?
मानवी शरीरावर केसांची लाखो मुळे (फॉलिकल्स) असतात. यात मेलॅनिननामक नैसर्गिक रंगद्रव्य तयार होते, जे केसांना रंग देण्यास कारणीभूत असते. कालांतराने केसांचे फॉलिकल्स रंगद्रव्य पेशी गमावतात आणि केस पांढरे व्हायला लागतात.
केस अकाली पांढरे होण्याची कारणे
वयानुसार केसांचा रंग बदलणे साहजिक आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे केस अकाली पांढरे होण्यास सुरुवात झाली तर मग मात्र ती चिंतेची बाब ठरते. वयाशिवाय याची अनेक कारणे असू शकतात.
शरीरात जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता-
बी-6, बी-12 जीवनसत्त्व, बायोटिन, डी जीवनसत्त्व किंवा ई जीवनसत्त्व यांची कमतरता, शरीरात लोह व लोह साठवणारे सीरम फेरीटिन, तांबे, सेलेनिअम, प्रथिने आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल-सी) कमी प्रमाणात असणे अकाली ग्रेयिंगला कारणीभूत ठरू शकते.
अनुवांशिकता ः काही व्यक्तींमधे केसांची अकाली ग्रेयिंग मोठया प्रमाणात अनुवांशिकतेशी जोडलेली असते. डाऊन सिंड्रोम, वर्नर सिंड्रोम यांसारख्या अनुवांशिक आजारांमध्येही केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
ऑक्सिडेटिव्ह ताण ः फ्री रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांचा प्रतिकार करण्यासाठी जेव्हा शरीरात पुरेसे अँटीऑक्सिडंट नसतात, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह ताण असंतुलन निर्माण होते. फ्री रॅडिकल्स हे अस्थिर रेणू असतात जे पेशींचे नुकसान करतात आणि वृद्धत्व आणि आजारपणात योगदान देतात.
काही वैद्यकीय विकार
थायरॉईडचे विकार आणि काही ऑटोइम्युन आजार यामुळेही केस अकाली पांढरे होऊ शकतात.
औषधे ः क्लोरोक्वीन (मलेरियासाठी वापरल्या गेलेल्या), मेफेनिसिन (एक स्नायू शिथिल करणारा), फिनालिथियोरिया (डीएनए चाचणीमध्ये वापरला जाणारा), ट्रायपेरानॉल (कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरला जाणारा), फ्लोरोब्युट्रोफिनोन आणि डिक्सरायझिन (विविध मनोविकार विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या) औषधांसह काही विशिष्ट औषधांचे सेवन.
शारीरीक आणि मानसिक ताण
असा सहसा विचार केला जातो की ताणतणावामुळे केस अकाली पांढरे होण्याची शक्यता असते. तथापि अभ्यासानुसार हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
धूम्रपान ः वैद्यकीय साहित्यानुसार धूम्रपान करणार्या व्यक्तींमध्ये अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण धूम्रपान न करणार्यांपेक्षा अडीच पट जास्त आहे.
केसांसाठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने
केमिकल हेअर डाय आणि केसांची उत्पादने, अगदी शॅम्पूदेखील अकाली केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात. यापैकी अनेक उत्पादनांमध्ये हायड्रोजन पेरोक्साईडसारखे हानिकारक घटक असतात आणि त्यांचा अतिवापर केसातील मेलॅनिन कमी करण्यास कारणीभूत ठरतो.