लेफ्टनंट श्रेयस पाटील यांचा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार
By esahas.com web team Wed 2nd Dec 2020 02:48 pm
कराड : टेंभू ता.कराड गावचे जेष्ठ नागरिक श्री बब्रुवाहन हिंदुराव पाटील(बाबा) यांचे सुपुत्र श्रेयस बब्रुवाहन पाटील यांची इंडियन आर्मी मधील गोरखा रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट पदी निवड झालेबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदार बाळासाहेब पाटील यांनी लेफ्टनंट श्रेयस पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पांडुरंग चव्हाण, बाळासाहेब निकम, ॲड.चंद्रकांत कदम, प्रशांत यादव, मिलिंद सुर्वे, दिगंबर डांगे, सुरेश पाटील, महिपती माने, विजयकुमार चव्हाण, पराग रामुगडे, संजय घोलप, सर्जेराव पानवळ, हणमंतराव जगदाळे, जयसिंग पाटील, विजय अतकरे, विकास पाटील, बाळासाहेब जगताप, राजेंद्र थोरात, शिवाजी पाटील, सचिन पाटील, मोहन जाधव, ॲड.विजय शिंदे, शिवलिंग जंगम, बब्रुवाहन पाटील, प्रताप सावंत, सौ.भरती पाटील, ॲड.दिलीप पाटील, उत्तम पाटील, माणिक ठोंबरे व ग्रामस्थ उपस्थित होते.