कराड

esahas.com

वाल्मिक कराड : वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती

Walmik Karad: पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे.

esahas.com

कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार

कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

esahas.com

उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल रोजी ता. कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी उदयनराजे भोसले यांनी केली.

esahas.com

कराडला दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करून सोनसाखळी जबरीने चोरणा-या सराईत दोन गुंडांना कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने जेरबंद करून त्यांच्याकडील हत्यार व रोकड, सोन्याची चेन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

esahas.com

कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले

कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव पोलीस गाडीने चौघांना उडवले. कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

esahas.com

कराड बाजार समिती बरखास्त करण्याची करणार मागणी

कराड बाजार समिती कोणाची जहागिरी नाही. बाजार समितीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. मी सोमवारी मुंबईला जाऊन पणनमंत्र्यांना भेटून ही बाजार समिती बरखास्त करावी,अशी मागणी करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देऊन आंदोलनाचे चांगले फलित तुम्हाला दोन दिवसांत मिळावे, यासाठी मी प्रार्थना करतो,असे सांगितले.

esahas.com

कराड जवळ ट्रक व वॅगनआर कार अपघातात तिघेजण जागीच ठार

पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड येथे चारचाकी ने पाठीमागून उभे असलेल्या आयशर ट्रकला भीषण धडक दिली. यामध्ये बहिण-भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत.

esahas.com

सातारा जिल्ह्यासह कराड मध्येही बंदला प्रतिसाद

मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी जालना जिल्ह्यात लाठी हल्ला केला. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कराडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्पर्तीने दुकाने व्यव...

esahas.com

कराडच्या जत्रेत अनोख्या शिल्पातून संविधानाचा जागर

महिला बचत गटांच्या उत्पादीत मालांच्या विक्री प्रदर्शन असलेल्या कराडच्या जत्रेत कोरो इंडिया संस्थेच्या सहकार्याने ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे समता फेलो मधुराणी थोरात व वैशाली पाटील यांनी संवैधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणी शिल्प सादर केले.

esahas.com

कराड तालुक्यातील महिलेची निर्घृण हत्या

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.

esahas.com

कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील...

कराडच्या कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल रविवारी पाडण्यास सूरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

esahas.com

कराड तालुक्यात चैन स्नॅचिंग

दुशेरे, ता. कराड गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता

कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com

मनाई असताना चक्क कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात झाली शिक्षकांची प्रचार सभा; यशवंतराव चव्हाण प्रेमी संतप्त

कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ चक्क प्रीतिसंगम उद्यानात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर उद्यानात सतरंज्या अंथरून प्रचार शुभारंभाची सभा देखील घेण्यात आली.

esahas.com

कराड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कराड तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी सातारा : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची सन 2022 ते 2027 कालावधीसाठी झालेल्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीची 1701 मते घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यांनतर दि.16 नोव्हेंबरं रोजी मतमोजणीप्रक्रिया घेण्यात आली. सदर निवडणूक ही पसंतिक्रम नोंदवून घेण्यात आले होते त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुमारे 36 तासाहून जास्त वेळ चालली. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात सुमारे 11131 पदवीधरांनी मतदान केले होते. या मतदारसंघातून 10 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यापैकी 9 उमेदवार हे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष मा.डॉ. संजय डी पाटील यांचे अध्यक्षतेखालील विद्यापीठ विकास आघाडीचे निवडून आले. तर विरोधी आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून आला. आजपर्यंत सिनेट अधिसभा निवडणुकीत नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व दिसून आले आहे परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघातून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून एकमेव तासवडे, ता.कराड गावचे सुपुत्र अमित जाधव यांना शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. इतर सर्व निवडून आलेले 9 उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा, सांगली आणी कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षत्र असल्याने सदर निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालये या अंतर्गत येतात. विद्यार्थी, पदवीधर, प्राध्यापक, कर्मचारी आणी संस्थांचालक यांना भेडसवणारे प्रश्न, शैक्षणिक धोरण, विद्यापीठ अर्थसंकल्प , परीक्षा आदी महत्वपूर्ण बाबींवर अधिसभा सिनेट मध्ये निर्णय घेण्यात येतात. अमित जाधव हे गेल्या बारा वर्षांपासून कॉंग्रेसच्या विद्यार्थी ( छडणख ) व युवक संघटनेत काम करीत आहेत. सध्या ते सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. विद्यापीठांतर्गत येणार्‍या सर्व घटकांचा आवाज बनून मी नक्की अधिसभेत हक्काने प्रश्न उपस्थित करून त्यावर न्याय मिळवून देईन अशी प्रतिक्रिया अमित जाधव यांनी विजयी झालेवर दिली. तसेंच मला सदर ठिकाणी काम करणेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब , विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष मा.डॉ.संजय डी पाटील साहेब , मा.आ.ऋतुराज पाटील, मा.आ.जयंत आसगावकर यांचे आभार मानले. या विजयाबद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाश बापू पाटील, डॉ.डी.आर मोरे सर, भैया माने, धैर्यशील बाबा पाटील, अमित कुलकर्णी, देवराज दादा पाटील, उदयसिंह पाटील, चित्रलेखा ताई कदम, अमरसिंह पाटणकर, निवास थोरात, सचिन बेडके - सूर्यवंशी, संजीव चव्हाण, पृथ्वीराज गोडसे, डॉ.सूर्यकांत केंगार, प्राचार्य एल. जी.जाधव , प्राचार्य मोहन राजमाने आदीनीं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

esahas.com

अखेर कराडमधील 9 फूटी मगर पकडण्यात वनविभागाला यश

खोडशी ग्रामस्थ मगरीच्या दहशतीखाली होते. वनविभागाने देखील ग्रामस्थांना दक्ष राहण्याची सूचना करत ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात न उतरण्याचे आवाहन केले होते. वनविभागाचे कर्मचारी गेली तीन दिवस मगरीला पकडण्याचे प्रयत्न करत होते. अखेर मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आल्यानंतर खोडशी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

esahas.com

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

esahas.com

कराड येथील शिवशंकर नागरी सह.पतसंस्थेला टाळे; ठेवीदार सभासदांची पोलिसात धाव...!!

कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांना धक्का बसला आहे. ही पतसंस्था गेली काही दिवस बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशन गाठले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

esahas.com

कराड शहरातून दुचाकीची चोरी

कराड शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केली असल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

श्रमिक मुक्ती दलाचा कराडमध्ये 15 रोजी वार्षिक महामेळावा : डॉ.  भारत पाटणकर

र्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दि.15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड येथील तलाठ्यावर गुन्हा

ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

esahas.com

कराड येथे महिलेला गंडा घालून सहा लाख रुपयांचे दागिने लंपास

कराड येथून अज्ञात भामट्यांनी हातचलाखी करून सहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करत महिलेला गंडा घातल्याची घटना घडली.

esahas.com

कराड येथून दुचाकीची चोरी

कराड, ता.कराड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कराड कडे नेण्यात येणाऱ्या 6 गावठी कट्टे आणि 30 जिवंत काडतुसांसह सुमारे 38 लाखांचा मुद्देमाल जप्त...!!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

esahas.com

अवैध दारू विक्री प्रकरणी कराड पोलिसांचा सहा ठिकाणी छापा

अवैध दारू विक्री प्रकरणी कराड शहर आणि तालुका पोलिसांनी विविध सहा ठिकाणी छापे मारले असून सहा हजार सहाशे वीस रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

esahas.com

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर गुन्हा

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड येथील दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिलेटिन कांड्यांचे मूळ शोधण्याचे कराड पोलिसांसमोर आव्हान

कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांद्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती. कराड पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळीच त्यांचा हा कट उधळून लावला.

esahas.com

कराडात पिस्तूलधारी यूवकांना पोलिसांनी केली अटक

शहरातील कृष्णा नाका परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह एक आणि तडीपार असलेल्या दोन आरोपींसह तिघांना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

esahas.com

जिल्हा पोलीस प्रमुखांकडून कराड येथील दोघेजण तडीपार

जिल्हा पोलीस प्रमुखांनी कराड येथील दोघाजणांना तडीपारीचे आदेश पारित केले आहेत.

esahas.com

दोन तडीपार गुन्हेगारांना कराड परिसरात अटक

सातारा जिल्हा आणि लगतच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून सहा महिन्या करता तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड एसटी स्टँड परिसरातून अटक केली.

esahas.com

कराडचा नवीन कृष्णा पूल वाहतुकीस खुला...!!

कराड ते विटा महामार्गावरील येथील कृष्णा नदीवर झालेला नवीन कृष्णा पूल दुपारपासून वाहतुकीला खुला करण्यात आला. पुलाचे काम तब्बल तीन वर्षे सुरू असल्याने पूल बहुचर्चित होता. त्यासाठी तब्बल ३५ कोटींचा खर्च आला आहे. पूल तब्बल ३२० मीटरचा आहे. पुलाखाली ४० मीटरचे आठ गाळे आहेत.

esahas.com

कराडवाडी गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कराडात थकबाकी वसुलीवेळी वायरमनला मारहाण; एकावर गुन्हा 

सुमंगलनगर, कार्वे नाका, कराड येथे वीज बिलांची थकीत वसुली करण्यासाठी गेलेल्या वायरमनला मारहाण करण्यात आली. गुरुवारी 24 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

शकिला शेख ठरली कराड तालुक्यातील पहिली महिला सैनिक

खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे, ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या होण्याचा मान मिळवला आहे.

esahas.com

कराड लोकन्यायालयात तब्बल साडेपाच कोटीच्या तडजोडी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कराड जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात विविध प्रकारचे तब्बल २ हजार १६१ न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये सुमारे ५ कोटी ५१ लाख २ हजार ४४५ रुपयांचे न्यायालयीन वाद तडजोडीने मिटवण्यात यश आले.

esahas.com

शंभूतीर्थ स्मारक उभारणीसाठी कराड तालुक्याचा सहभाग घेणार

स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

esahas.com

कराडात ऑल आऊट मोहिमेत 15 जणांवर कारवाई

कराड शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातुन शुक्रवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑल आऊट मोहिमेत एकुण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.  

esahas.com

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव संपन्न

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

esahas.com

कराड नगरपालिका आवारात एकाकडून पालिका अधिकाऱ्यास मारहाण

येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

esahas.com

कराडातील जळीतात सुमारे साडे चौदा लाखांचे नुकसान

येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

esahas.com

कराडसह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.

esahas.com

कराड शहरात लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे जळून खाक

शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 20 ते 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे.

esahas.com

कराडात डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार

येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत विकास केला

काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.

esahas.com

कराडमध्ये पिस्तुल व मॅगॅझीनसह युवकास अटक

येथील भाजी मंडई परिसरात पोलिसांनी पिस्तल व मॅगॅझीनसह युवकास अटक केली. परिसरातील हॉटेलमध्ये पिस्तुल घेवून बसलेला असताना पोलिसांनी छापा टाकून रेकॉर्डवरील संशयीतास ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी ७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे पिस्तुल व मॅगॅझीन जप्त केले आहे.

esahas.com

कराडात बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध

येथील मारूतीबुवा कराडकर मठासमोरच वाईन विक्रीवरून वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी काल साताऱ्यात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व वारकऱ्यांतर्फे झालेल्या निषेधात कराडकरांच्या मठासमोरच बंडातात्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

esahas.com

कराडात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील चेन लांबवली  

येथील आझाद चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. गुरुवारी ३ रोजी दुपारी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेला चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

esahas.com

कराडात दोन व्यवसायिकांना मारहाण करून लुट

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणानजीक दोघांनी दोन व्यावसायिकांना लुटल्याची घटना घडली. त्यांनी सोमवारी 31 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास या व्यावसायिकांना मारहाण करून पैशाची मागणी केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या खिशातून व गल्ल्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

esahas.com

कराडात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी

कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या होस्टेलसाठी 9 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून असून पुढील वर्षापासून कराडमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.

esahas.com

कराडात महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ

येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

esahas.com

कराड तालुक्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्या

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

esahas.com

कराडची महिला व बालकल्याण समिती राज्यात प्रथम

कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने  २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

esahas.com

कराडात 'झिरो वेस्ट' संकल्पनेतून वाढदिवस साजरा

येथील नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाचा भाग असलेल्या "झिरो वेस्ट" या उपक्रमांतर्गत नुकताच एक वाढदिवस साजरा करण्यात आला. प्लास्टिक वस्तू, कागद, प्लेट तसेच अन्य वेस्ट न होणाऱ्या वस्तूंना बगल देत हा वाढदिवस साजरा झाला. शहरातील मारुती काटरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या छोटेखानी वाढदिवस कार्यक्रमात ‘झिरो वेस्ट’ संकल्पना राबवत जनजागृती करण्यात आली.

esahas.com

पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एक अटकेत; कराड शहर पोलिसांची कारवाई

कृष्णा कॅनाॅल (कराड) जवळ इनोव्हा कारमधून पळून जाताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसाला जखमी करून पसार झालेल्या सराईतांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली. ओगलेवाडी पोलिसांनी रहिमतपूर येथे ही कारवाई केली.

esahas.com

कराड नगरपालिकेच्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत कराड नगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालय, शाळा, मार्केट, स्वच्छ सोसायटी आदींचे मूल्यांकन व गुण प्रदान करून या स्पर्धेचा निकाल जाहीर  करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

esahas.com

कराडात विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

शहरात नगरपालिका आणि पोलिसांनी गुरुवारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संयुक्तिक मोहिमेत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी शहरात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

esahas.com

कराड आगारातील एसटी कर्मचारी धडकणार थेट मुंबईत

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

कराड पालिकेकडून बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता

येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 अंतर्गत बोटीद्वारे कृष्णा नदीची स्वच्छता केली. यामध्ये नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा गोळा करण्यात आला. तसेच नदीपात्रालगत झाडा-झुडपांमध्ये  अडकलेला प्लास्टिकसह अन्य कचराही काढण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.

esahas.com

कराडात जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पोवर कारवाई

जनावरांची बेकायदा वाहतूक करणारे दोन टेम्पो अडवून पोलिसांनी चाळीस म्हैशी व अकरा रेडकांची सुटका केली. तसेच टेम्पोच्या दोन चालकांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

esahas.com

कराड ही शूर-विरांची भूमी : लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत

कराड शहरासह परिसराला मोठी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी आहे. या भूमीने अनेक शूर, वीर योद्धे दिले असून कराड ही खऱ्या अर्थाने शूर-विरांची भूमी आहे. मी मराठा बटालियनमध्ये कार्यरत असून या पवित्र भूमीत आल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शूर-विरांच्या या पवित्र भूमीला मी आदरपूर्वक सॅल्युट करतो, असे गौरवोद्गार ७ मराठा लाईफ इन्फट्री बटालियनचे लेफ्टनंट राघवेंद्र सिंह शेखावत यांनी काढले.

esahas.com

कराड नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार

येथील नगरपालिकेचा ई-कचरा विघटनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील संपूर्ण ई-कचऱ्याचे विघटन करण्यासाठी महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत 5 वर्षाचा करारही केला आहे. नुकताच कराड नगरपालिका आणि महालक्ष्मी ई-रिसायकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा करार करण्यात आला.

esahas.com

कराडात युवकावर धारदार शस्त्राने वार

शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

esahas.com

कराडात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट जनजागृती मोहीम

दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

esahas.com

'कराड गौरव' पुरस्काराचा गुरूवारी वितरण सोहळा

येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर  'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.

esahas.com

अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कराड शहर पोलिसांची धडक कारवाई

कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

esahas.com

जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण उपचार सुविधा आता कराडमध्ये उपलब्ध

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलसोबत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कराडमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती आणणारा यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करतील आणि काम करतील.

esahas.com

कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेचा कराडमध्ये निषेध

कर्नाटकमध्ये (बंगळूर-सदाशिवनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून कराडमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

esahas.com

कराडला अमर जवान स्मृती स्तंभास मान्यवरांकडून अभिवादन

विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

esahas.com

बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्याच्या आनंदात कराडात जल्लोष

सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

esahas.com

कराडात मुंगसाच्या केसांपासून बनवलेले पेंटींग ब्रश जप्त

बुधवार दि. १५ रोजी वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड आणि मलकापूर येथे एकाचवेळी ५ रंग व्यवसायिक दुकानदारांवर छापा टाकला. यामध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाचही दुकानातून वनविभागाने 1 हजार 735 ब्रश जप्त केले आहेत.

esahas.com

कराड विमानतळ परिसरातील निर्बंध हटवून स्थानिकांना दिलासा द्या

कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर असलेले विमानतळ लहान व विनापरवाना आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि छोट्या खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र, या विमानतळामुळे आजूबाजूच्या 20 किमी अंतरातील परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

esahas.com

चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी कराड नगर अभियंता व उपअभियंता यांना तात्काळ निलंबित करा !

चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी नगर अभियंता व उप अभियंता यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ येथे प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे  मानव कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सलीम पटेल व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. 

esahas.com

कराड नगरपालिकेकडून 'त्या' कामाला स्थगिती

बुधवार पेठेतील नगरपालिकेने खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून विराट विजय चव्हाण या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील 'त्या' कामाला नगरपालिकेने स्थगिती दिली आहे.

esahas.com

कराडात एकाला लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून मारहाण; दोघांना अटक

शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

esahas.com

कराड विमानतळ परिघात लावलेले निर्बंध उठवा

कराड विमानतळ परिसरात  लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.

esahas.com

कराड तालुक्यातील ११ हातपंपांचे पाणीनमुने दुषित

कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

esahas.com

कराडात शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी खोदलेल्या खड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.

esahas.com

कराड तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव

अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.

esahas.com

कराड तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 79 लाख मंजूर

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

esahas.com

कराडला अवकाळी

कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.

esahas.com

कराड आगाराचे आजअखेर १ कोटी ८४ लाखांचे नुकसान

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. कराड बस स्थानकाबाहेरही एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे कराड आगाराचे संपकाळात आजअखेर १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली

esahas.com

सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक

सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी सदर बस तक्रार देण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

esahas.com

कराडला आढळले पुरातन सातवाहनकालीन जातं

पंताचा कोट परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरातील चित्रकला महाविद्यालयात अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यातील दगडी जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन असल्याचा दावा इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी केला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासातून याचा उलगडा झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

esahas.com

जयहिंद फौंडेशनच्या शौर्याजंली यात्रेचे कराडमध्ये जंगी स्वागत

१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.

esahas.com

समर्थ बुथ अभियानात कराड दक्षिण मंडलची उत्कृष्ट कामगिरी

भाजपच्या समर्थ बुथ अभियानामध्ये सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण मंडलाने उत्कृष्ट काम केले. याबद्दल वाई येथे पार पडलेल्या भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कराड दक्षिण मंडल टीमचा सत्कार करण्यात आला.

esahas.com

कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीसह निलंबनाची कारवाई

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात शासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ करत त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, एसटी कर्मचारी अद्यापही विलगीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे.

esahas.com

कराडात मनसेकडून संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन

भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

esahas.com

कराडात रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राची सुरुवात

रुग्णालयातून रुग्ण घरी आल्यानंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ ठराविक  साधनांची गरज भासते. ही साधने त्या काळात अत्यावश्यक असली, तरी काही काळानंतर त्या साधनांची रुग्णांना गरज भासत नाही. गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अशी साधने कायमची विकत घेऊ शकत नाहीत.

esahas.com

कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा  विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.

esahas.com

भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला

पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

esahas.com

स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरांमध्ये कराड, पाचगणीची बाजी

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.

esahas.com

कराड नगरपालिकेतर्फे भव्य वृक्ष संवर्धन स्पर्धेचे आयोजन

कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.

esahas.com

कराडला एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात संप सुरु आहे. कराड आगारात मंगळवार दि. १६ रोजी संपाचा नववा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांची आवडती लालपरी गेले नऊ दिवस आगारात उभी राहिली आहे.

esahas.com

कराडात 'बळीराजा'चे धरणे सातव्या दिवशीही सुरूच  

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे.

esahas.com

कराड पालिकेचे ‘होम टू होम’ जनजागृतीत सातत्य

शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.

esahas.com

कराडात एसटी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा

राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्‍यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

esahas.com

कराडात एसटी कर्मचार्‍यांनी मुंडन करून नोंदवला निषेध

कराड बस स्थानकासमोर कर्मचार्‍यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांसह सरकारचाही घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

esahas.com

कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांतील 13 जण तडीपार

समाजविघातक कृत्य करणार्‍या कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांमधील 13 जणांना आज तडीपार आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.