sports

डॉ. विलासराव साळुंखे यांचे निधन


विटा : येथील प्रतिथयश डॉ. विलासराव महादेव साळुंखे (वय ७७) यांचे निधन झाले. शिवप्रताप उद्योग समूहाचे अध्यक्ष, नॅशनल गोल्ड अॅन्ड सिल्व्हर रिफायनरी असोसिएशन चे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांचे बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा, मुलगी , सुना , नातवंडे व तीन भाऊ असा परिवार आहे. शिवप्रताप को - आॅप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या निर्मिती मध्ये त्यांचा महत्त्वपुर्ण सहभाग होता. सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती अंगी होती.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविर्सजन शुक्रवार ( ता.२८ ) रोजी खानापूर रस्त्यावरील वैकुंठ धाम (मार्केट यार्ड) च्या स्माशनभूमीत सकाळी नऊ वाजता आहे.