जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आणखी 422 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 422 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 1134 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1134 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 10, उपजिल्हा रुग्णालय, कराड 44, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 92, कोरेगाव 82, वाई 155, खंडाळा 109, रायगाव 90, पानमळेवाडी 58, मायणी 84, महाबळेश्वर 50, पाटण 19, दहिवडी 46, खावली 49, तळमावले 20 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 226 अशा एकूण 1134 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


