sports

सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी

खा. उदयनराजे भोसले यांची ना. अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलीकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मं

सातारा : सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलीकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे केली.

राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या महिल्या आठवड्यात राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये सातारच्या भौगोलिक, सामाजिक आणि विषम परिस्थितीचा विचार करून रस्त्यांची विविध कामे सुचवताना खा. उदयनराजे भोसले यांनी ना. अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग सर्वाधिक पर्जन्यमानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. 

महाबळेश्‍वर, नवजा, कोयना या खोर्‍यात नेहमीच सर्वाधिक पाऊस पडत असतो तर सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग गेल्या कित्येक वर्षापासून अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. जलसिंचनाकामी जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील ग्रामस्थांनी केलेल्या असीम त्यागामुळे आणि जलसंधारणाच्या कामांमुळे आज गेल्या कित्येक वर्षातील अवर्षणाची परिस्थिती थोड्याशा प्रमाणात सुधारत आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून कास पठाराचा आणि महाबळेश्‍वरसह अन्य काही भागाचा समावेश केला गेला आहे.  

सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या देखील वेगळा आहे. पश्‍चिम भागातील डोंगरदर्‍यांच्या रांगा तर पूर्वेकडे समतल कोरडा प्रदेश यामुळे सातारा जिल्ह्याचा राज्याच्या अंदाजपत्रकाकरिता विचार करताना, विशेष तरतूद केली गेली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

त्याचप्रमाणे सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे. आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो, तसेच महाराष्ट्रात सर्वांत जास्त वीज निर्मितीचा जिल्हा म्हणूनही सातारा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. येथील राजकारणामध्येही समाजकारण करण्यावर भर असतो, असे विविधांगी वेगळेपण जपणार्‍या सातारा जिल्ह्यावर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून विशेष लक्ष पुरवावे, अशी विनंती ना. अशोक चव्हाण यांना करताना, जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या गतिमान दळणवळणाच्या सुविधेसाठी काही कामांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी सुचवण्यात आल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

ना. अशोक चव्हाण यांनी यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयीच्या बाबींवर सरस निरस मानाने विचार करून, सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रस्ते विकास कामांना, झुकते माप निश्‍चितपणे दिले जाईल. जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे आवर्जून सांगितले.