sataranews

esahas.com

सातार्‍यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नवीन 78 बेडची उभारणी

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.

esahas.com

कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावी अमंलबजावणी करा

‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.

esahas.com

मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरसावला भोंदवडेचा अवलिया शिक्षक

धकाधकीच्या अन् वेगवान धावत्या आयुष्यातून वेळ काढून महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेले भोंदवडे येथील पेशाने शिक्षक असलेले दयानंद पवार हे 1985 पासून म्हणजे जवळपास 35 वर्षांपासून परळी खोर्‍यातील मुली-महिला सक्षम व्हाव्यात तसेच येणार्‍या सर्व परिस्थितीशी निर्भिडपणे सामोरे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य करताहेत.

esahas.com

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी

‘केंद्र शासनाच्या  विविध विकासाच्या योजनांची  योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्राम विकासाच्या योजनांवर भर द्यावा.जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करून सोडविल्या प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खा. श्रीनिवास पाटील व सहअध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी

सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलीकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्जोन्नतीकरिता भरीव तरतूद करावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मं

esahas.com

लग्न समांरभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच परवानगी

सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

esahas.com

मधुमक्षिका पालन व्यवसायातून शेतकर्‍यांनी आर्थिक उन्नती साधावी

‘आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून, त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

esahas.com

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सातारा जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर करण्यात आली.

esahas.com

सायकल रॅलीने ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ अभियानाची सांगता

दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियाना’ची भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘सायकल रॅली’ने सांगता करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दै. ‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.