लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेकदा जिमला जाऊन ट्रेडमिलवर धावत असतो. ट्रेडमिल आपल्या शरिराला सुदृढ ठेवण्यास खूप मदत करते. परंतु, या टाळेबंदीमुळे लोकांनी जिमला जाणे बंद केले आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. अशा वेळी जर तुम्ही परत ट्रेडमिलवर धावण्याचा विचार करत असाल, परंतु, असे करताना तुमच्या मनात भीतीही निर्माण होत असेल तर, ती दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेकदा जिमला जाऊन ट्रेडमिलवर धावत असतो. ट्रेडमिल आपल्या शरिराला सुदृढ ठेवण्यास खूप मदत करते. परंतु, या टाळेबंदीमुळे लोकांनी जिमला जाणे बंद केले आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. अशा वेळी जर तुम्ही परत ट्रेडमिलवर धावण्याचा विचार करत असाल, परंतु, असे करताना तुमच्या मनात भीतीही निर्माण होत असेल तर, ती दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. चला तर मग, पाहुया ट्रेडमिलवर धावण्यात येणार्या अडचणींना दूर करणार्या महत्वपूर्ण गोष्टी.
ट्रेडमिलवर धावण्याची भीती दूर करणार्या गोष्टी
1. ट्रेडमिलवर धावण्याआधी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. ट्रेडमिलवर धावण्याआधी वॉर्मअप करायला हवा. तो केल्याने भीती दूर होण्यासोबतच दुखापत होणे किंवा शरिरातील ऑक्सिजनच्या प्रभावाने कडकपणा येणे यासारख्या समस्या दूर होतात. 2. ट्रेडमिलवर सुरूवातीला धवण्याचा वेग कमी ठेवावा. ट्रेडमिलवर धावण्यासाठी ती आधी 1 ते 2% वर उचलून त्यानंतरच त्यावर धावायला सुरूवात करावी. जर तुम्ही फक्त चालणार असाल तर, ती शून्यावरच ठेवायला हरकत नाही. एकदम असे करण्यास भीती वाटत असेल तर हळूहळू याची सवय लावावी. अशा पद्धतीने ट्रेडमिलचा वापर केल्यास त्याची भीती वाटणार नाही.
3. ट्रेडमिलवर धावण्याआधी त्याची पूर्ण माहिती करून घ्या. ट्रेडमिलवर धावण्याआधी त्याचा वेग, डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटर, फिक्स वॉकआउट, कॅलरी बर्न कॅलक्युलेटर, टाईम डिस्प्ले आणि इंकलाईट बटन यांबद्दलची माहिती प्रशिक्षकास विचारावी. यामुळे त्या यंत्राची भीती राहणार नाही. 4. ट्रेडमिलवर धावण्यासाठी योग्य शूजची निवड करायला हवी. ट्रेडमिलवर धावण्याआधी योग्य शूजची निवड करावी. त्याने धावणे सहज व सोपे होते. जर बुट व्यवस्थित नसेल तर आपलं पूर्ण लक्ष धावण्यापेक्षा त्या बुटाकडेच जास्त जाते. 5. ट्रेडमिलवर धावतेवेळी आपला तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. जर तुम्ही ट्रेडमिलवर पहिल्यांदाच धावत असाल तर तुमचा तोल जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता असते.