maharashtra

कास पठारावरील प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस सुरु करणार : जिल्हाधिकारी जयवंशी


Electric buses will be started to prevent pollution on Kas Plateau: Collector Jayavanshi
यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला याबरोबर बामणोली परिसराकडे जाण्यासाठी घाटाई मार्ग रस्ता खुला करण्याची माहिती दिली. यावेळी कास पठारावर कामी होणारे फुलांचे प्रमाण याबाबतची जिल्हाधिकार्यांनी गांर्भियाने दखल घेवून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिला. लवकरच इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ‘साहस वार्ता’ शी बोलतांना सांगितले.

 कास पठार हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश झाल्यापासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओडा निर्माण झाला असल्यामुळे या भागात पर्यटक आणि त्यांची वाहने यामुळे पदुषण निर्माण होत आहे. यावर कायम स्वरुपी उपाय योजना काढण्याच्या उद्देशाने रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी सातारा, अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, सातारा, अनिल चव्हाण, उपप्रादेशीक अधिकारी, सातारा. त्यांचबरोबर पी.एम.पी.एल. पुणे व वनविभाग, सातारा, पर्यटनमंत्रालय महाराष्ट्र राज्यच्या विविध अधिकार्यांनी एकत्रीत रित्या कास, बामणोली, वजराई धबधबा याठिकाणी येणार्या पर्यटक आणि त्यांच्या वाहनाच्या पार्किंग व प्रदुषण कामी करण्याच्या दुष्टीने पहाणी दौरा काल, दि. ६ रोजी केला. यावेळी रुचेश जयवंशी यांनी पाहणी केला असता त्यांनी कास व परिसरातील पर्यटक आणि त्यांच्या वाहनाच्या पार्किंग पाहता त्यांनी कास व पठारावर पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करून कास पठारावर होणारे कास परिसरामधे होत असलेली गाड्यांची वरदळ कमी करण्याच्या व प्रदूषण रोखण्यासाठी पर्यटन विकास मंडळामार्फत पी. एम. पी. एल. मार्फत दहा बसेस सुरू करण्या ची योजना आखल्याचे जयवंशी यांनी स्पष्ट केले. यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला याबरोबर बामणोली परिसराकडे जाण्यासाठी घाटाई मार्ग रस्ता खुला करण्याची माहिती दिली. यावेळी कास पठारावर कामी होणारे फुलांचे प्रमाण याबाबतची जिल्हाधिकार्यांनी गांर्भियाने दखल घेवून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिला. लवकरच इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ‘साहस वार्ता’ शी बोलतांना सांगितले.

मोफत इलेक्ट्रीक बसने पर्यटकांना कास परिसरात आणून याच परिसरातील जाणकार व तज्ञ नागरिकांची टूरिस्ट गाईड म्हणून नेमणुक करण्यात येईल. या योजनेमुळे प्रदुषण कमी होवून परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. सदरची योजना प्रयोगिक तत्वाखाली सुरुवातील सुरु करून त्याची व्याप्ती वेळेनूसार कमी जास्त करण्यात येईल.
                      -रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी सातारा,