यावेळी सातारा कास रस्त्यावर असलेल्या गणेश खिंड परिसरातील पठारावर पर्यटकांना गाड्या पार्किंग करुन पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार्या इलेक्ट्रिक बस ची पर्यटकांना मोफत बस सेवा सुरु करण्यासंदर्भात पाहणी दौरा झाला याबरोबर बामणोली परिसराकडे जाण्यासाठी घाटाई मार्ग रस्ता खुला करण्याची माहिती दिली. यावेळी कास पठारावर कामी होणारे फुलांचे प्रमाण याबाबतची जिल्हाधिकार्यांनी गांर्भियाने दखल घेवून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे आदेश वनविभाग व कास संवर्धन समितीस दिला. लवकरच इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी ‘साहस वार्ता’ शी बोलतांना सांगितले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!