sports

रणजितसिंह देशमुख यांच्यासारखे कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच

अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती यांनी हरणाई सूतगिरणीच्या  भेटीप्रसंगी व्यक्त केले मत

‘हजारो महिलांच्या हाताला कामे देऊन दुष्काळी पट्ट्यात रोजगार उपलब्ध करून देणार्‍या रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच आहे,’ असे मत ओरिसा राज्यातील उच्च न्यायालयातील वकील व ‘माँ घर फाउंडेशन’च्या संस्थापिका-अध्यक्षा अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती यांनी केले.

निमसोड : ‘हजारो महिलांच्या हाताला कामे देऊन दुष्काळी पट्ट्यात रोजगार उपलब्ध करून देणार्‍या रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे कोहिनूर हिराच आहे,’ असे मत ओरिसा राज्यातील उच्च न्यायालयातील वकील व ‘माँ घर फाउंडेशन’च्या संस्थापिका-अध्यक्षा अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती यांनी केले.

येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सहकारी सूतगिरणीच्या  भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक -अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी शाल, श्रीफळ, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

महिलांना सक्षम बनविणारा ‘हरणाई’ हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगून अ‍ॅड. मोहंती म्हणाल्या, ‘ओरिसातील बहुतांशी भाग मागासलेला असून कापसाचा कच्चामाल मुबलक आहे. येथेे रणजित भैय्यांनी ‘साबरमती कॉटन व्हॅली’ उभारणीसाठी विशेष पुढाकार घ्यावा. यामुळे ‘माँ घर फाउंडेशन’च्या लाखो महिलांना रोजगार उपलब्ध होईल. ’

त्या पुढे म्हणाल्या, ‘महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून सशक्त कुटुंब निर्मितीसाठी नशामुक्त व हिंसामुक्तीचे जनआंदोलन ओरिसात यशस्वी केले आहे.’

रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘उपेक्षित महिलांसाठी लक्षवेधी काम करणार्‍या अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती यांची अमेरिकेतील ‘थाऊजंट ऑफ डॉटर’ या शंभर यशस्वी महिलांच्या पुस्तकात जागतिक पातळीवरती नोंद घेतली गेली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. नशामुक्त व हिंसामुक्त कुटुंब या महाराष्ट्रातील जनआंदोलनास आम्ही सक्रिय पाठिंबा देणार असून, ओरिसातील कॉटन व्हॅलीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.’

यावेळी संचालक गजानन शिंदे, प्रॉडक्शन मॅनेजर अमृत मटकल्ली,  प्रवीण जगताप, गफार पठाण, नीलेश घार्गे-देशमुख, अमित पवार, सद्दाम मुल्ला आदींसह कर्मचारी उपस्थित होते.