sports

कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार पार 

गुरुवारी दिवसभरात 337 जण कोरोना पॉझिटिव्ह 

सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या 9 हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 337 रुग्ण आढळले आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या 9 हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 337 रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 277 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

आणखी 260 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 260 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
यामध्ये जावली तालुक्यातील 1, कराड 33, खंडाळा 29, खटाव 16, कोरेगाव 34, महाबळेश्‍वर 10, पाटण 13, फलटण 27, सातारा 83, वाई 14 अशा एकूण 260 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.

 681 जणांचे स्त्राव तपासणीला
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 97, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 91, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 33, कोरेगाव 14, वाई 50, खंडाळा 46, रायगाव 58,  मायणी 78, महाबळेश्‍वर 50, पानमळेवाडी 63, पाटण 8, दहिवडी 26, खावली येथील 48 अशा एकूण 681 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.