सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांमध्ये दररोज मोठी भर पडत आहे. शनिवारीदेखील 345 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांमध्ये दररोज मोठी भर पडत आहे. शनिवारीदेखील 345 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच दिवसभरात 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी 342 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 342 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जावली तालुक्यातील 13, कराड 144, खंडाळा 25, खटाव 5, कोरेगाव 26, महाबळेश्वर 15, माण 4, पाटण 17, फलटण 16, सातारा 60, वाई 17 अशा एकूण 342 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.444 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 12, कोरेगाव 30, खंडाळा 90, मायणी 22, महाबळेश्वर 7, पानमळेवाडी 60, खावली 160 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 63 अशा एकूण 444 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


