cineworld

शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण


अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच आगामी वेबी सीरिजची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. यापूर्वी राज आणि डीके यांच्या द फॅमिली मॅन’ या सीरिजला जवळजवळ 240 पेक्षा अधिक देशांमध्य लोकप्रियता मिळाली. आता त्यांच्या आगमी सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच आगामी वेबी सीरिजची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. यापूर्वी राज आणि डीके यांच्या द फॅमिली मॅन’ या सीरिजला जवळजवळ 240 पेक्षा अधिक देशांमध्ये लोकप्रियता मिळाली. आता त्यांच्या आगमी सीरिजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
आपल्या डिजिटल पदार्पणाबाबत शाहीद कापूर म्हणाला, मला राज आणि डीके यांच्यासोबत काम करण्याची मनापासून इच्छा होती. माझ्या डिजिटल व्यासपीठावरील पदार्पणासाठी मला त्यांच्याइतके योग्य दुसरे कोणीही वाटले नाही. त्यांच्यासोबत काम करायला मिळते आहे त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी जेव्हा पहिल्यांदा ही कथासंकल्पना ऐकली तेव्हाच ती मला अतिशय भावली होती. तेव्हापासून आतापर्यंतचा आमचा एकत्रित प्रवास खरोखरच रोमांचकारी आहे.
राज आणि डीके ही निर्माती जोडी सीरिज विषयी बोलताना म्हणाली, आम्ही करतो त्या प्रत्येक कलाकृतीमध्ये आमच्याच पूर्वीच्या कालाकृतीपेक्षा उत्तम काहीतरी देणे हेच आमच्यासमोरील आव्हान असते. या सीरिजसाठी शाहीद हा एकमेव अभिनेता आम्हाला परिपूर्ण वाटला. या सीरिजसाठी शाहीद आमची सुरुवातीपासूनची एकमेव निवड होता. आम्ही लगेच त्याच्याशी संपर्क साधला. शाहीदला पाहणे आणि त्याच्यासह काम करणे ही नेहमीच आनंदाची बाब असते. तो ज्या आत्मीयतेने भूमिका साकारतो ते पाहणे विलोभनीय असते. ही सीरिज तयार करण्यास आम्ही उत्सुक आहोत!