sports

कळकरायच्या सुळक्यावर ‘अ‍ॅडव्हेंचर टीम’ने फडकविला तिरंगा

छत्तीसगढ येथे वीरमरण आलेल्या शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे. या सुळक्यास ‘कळकरायचा’ सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अ‍ॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छत्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

सातारा : उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे. या सुळक्यास ‘कळकरायचा’ सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अ‍ॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छत्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या सुळक्याची उंची 180 फूट आहे. साधारण ही जागा पाहूनच जिथे सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, तिथे या कळकरायचा सुळक्याची चढाई करणे याची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. मात्र, हे धाडस कुणी करणार नाही ते गिर्यारोहक रोहित जाधव आणि त्यांचे सहकारी आशिष मगरे यांनी हे   एकप्रकारे आव्हान स्वीकारले. सकाळी साधारणतः 8 वाजता जांभिवली या गावापासून ढाक बहिरी या किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली आणि पायथ्याशी 9 वाजता ते पोहोचले. ढाक किल्ल्याची भटकंती करून कळकरायचा सुळक्याच्या पायथ्याशी 12 वाजता पोहोचल्यानंतर मोहिमेची पूर्ण तयारी करीत बारा वाजता चढाई करण्यास सुरुवात झाली. 

साधारणतः एक ते दीड तासात मोठ्या आत्मविश्‍वासाने व जिद्दीने सर्व सुरक्षा साधनांचा, रोपचा वापर करीत यशस्वीपणे चढाई करीत सुळक्यावर शिलेदारांनी पाय ठेवताच हातात तिरंगा फडकवत राष्ट्रगीत म्हटले. तसेच छत्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि ही मोहीम आपल्या भारतीय जवानांना समर्पित केली.

चढाई करतानाचे आलेले अनुभव सांगताना सुळक्यावर असणारी निसरडी गवताळ पाऊलवाट, समोर थेट डोक्यावर 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई तर सुळक्याच्या बाजूला असणारी खोल दरी सगळंच थरारक होतं. सुळक्यावर चढाई करताना इकडचा पाय तिकडे जरी पडला तर थेट खोल दरीच्या जबड्यात विश्रांती. चढाई करताना एक एक करून दोर पकडून पुढे चालू लागलो, पहिला कातळ चढून पुढे गेलो, फक्त उभा राहण्या इतकी जागा होती, दुसरा टप्पा अगदी आनंदात चढून वरती गेलो आता इथून पुढे कस लागणार होती. 

कळकरायचा सुळका चढाई करताना तिसर्‍या ठिकाणी एक ट्रॅव्हर्स चढाई लागते, ती चढाई करताना जीव मुठीत घेऊन जावं लागत. या ठिकाणी जर काही चूक झाली तर सरळ आपण दरीत कोसळणार यात काही शंका नाही. जीवाला धोकादायक ठरणारी ही मोहीम आहे. मात्र, शिलेदार अ‍ॅडव्हेंचर टीमच्या साथीने शेवटी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.

गिर्यारोहक रोहित जाधव यांनी शिलेदार टीमचे सेनापती सागर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते केली. तसेच राकेश यादव, विनायक, ऋषी, सोपान, राज, कविता, अमिता, माधवी पवार यांची साथ सुळक्यावर यशस्वीपणे चढाई करण्यासाठी मोलाची ठरली.