उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे. या सुळक्यास ‘कळकरायचा’ सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छत्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!