sports

सोमंथळी येथे पाणंद रस्ता खुला करण्यासाठी उपोषण


राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्या प्रश्‍नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी धोंडिराम सोडमिसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंदिरात बेमुद उपोषण सुरू केले आहे.

फलटण : राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नसल्याने त्या प्रश्‍नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी धोंडिराम सोडमिसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंदिरात बेमुद उपोषण सुरू केले आहे.

सोमंथळी येथील पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत स्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगून वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून सोमंथळी ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवाजी सोडमिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सोमंथळी (ता. फलटण) येथील 23 फाटा ते बारामती-फलटण रोड (पोकळे वस्ती शाळा रस्ता) या पाणंद रस्त्यांसाठी आपण गेली 2 वर्षे प्रयत्नशील असल्याचे शिवाजी सोडमिसे यांनी सांगितले.